बळिराजा पुन्हा संपावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

औरंगाबाद - समस्या सोडविण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात एक जूनपासून पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मूलभूत समस्यांसह विविध मागण्यांसाठी एक ते दहा जूनपर्यंत राज्यभर हा संप करण्यात येणार आहे. दरम्यान, दहा जूनला भारत बंदची हाकही देण्यात आली आहे, अशी माहिती किसान क्रांती जन आंदोलनाच्या ॲड. कुसुम सावंत यांनी आज दिली.

सावंत म्हणाल्या, ‘‘संपाला पाठिंबा न देणाऱ्या राजकीय पुढाऱ्याला दहा जूनपर्यंत गावांमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही; गतवर्षी मंदसौरमध्ये गोळीबार हुतात्मा शेतकऱ्यांना सहा जूनला देशभर श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. दहा जूनला दुपारी दोन वाजेपर्यंत भारत बंदचीही हाक देण्यात आली आहे. या संपामध्ये राज्यभरातील विविध १३० शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.’’

हा संप कशासाठी
    कृषी अभ्यासकांच्या सहकार्याने शेतमाल आयात, निर्यात धोरणे ठरवावीत
    जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी एकरी आठ हजार रुपये द्यावेत
    सर्व उत्पादनांना दोन महिने आधी शेतमालाचा हमीभाव जाहीर करावा व २४ तासांत चुकारा द्यावा 
    दुधाला ५० रुपये प्रतिलिटर भाव द्यावा
    आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे रद्द करावेत 

ही असेल रणनीती
    संपादरम्यान भाजीपाला, फळे, धान्य, दूध आदी दहा जूनपर्यंत शहरात न पाठवता दुधाचे पदार्थ बनवा 
    भाजीपाला गरजूंना द्यावा, उर्वरित सुकवावा
    शेतकऱ्यांनी हिंसेपासून दूर राहावे

Web Title: farmer strike government