कंधार तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

बारूळ - काटकळंबा (ता. कंधार) येथील तरुण शेतकरी परमेश्वर गोविंद एकाळे (वय 23) यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 13) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या गावात यंदाची ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. परमेश्‍वर यांच्या आई-वडिलांनी बॅंकेतून कर्ज घेतले होते; परंतु सततच्या नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्‍न एकाळे कुटुंबीयांसमोर होता. याच विवंचनेत परमेश्‍वर यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
Web Title: farmer suicide