दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

औरंगाबाद - काटी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी चंद्रकांत नृसिंह देशमुख (वय 66) यांनी गुरुवारी (ता. 16) रात्री उशिरा शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मुलाने घेतलेल्या ट्रॅक्‍टरचे सात लाखांचे कर्ज कसे फिटेल, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

टाकळी माळी (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी विष्णू पुंडलिकराव बुरकुल (35) यांनी शुक्रवारी (ता. 17) सकाळी सातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. बॅंक, खासगी कंपनीचे त्यांनी कर्ज घेतले होते. नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत असल्याने ते विवंचनेत होते. त्यातून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. करमाड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.