जालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

राजूर - खामखेडा (ता. भोकरदन) येथील शेतकरी काकासाहेब सुखदेव नागवे (वय 38) यांनी सोमवारी (ता.23) सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. नागवे यांच्या नावे दोन एकर शेती आहे. त्यांच्यावर बॅंकेसह एका फायनान्स कंपनीचे कर्ज होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
Web Title: farmer suicide in jalana district