कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Hanging
Hanging

सेलू (जि. परभणी) - आईने पहाटे आवाज दिला, तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. घरात पाहणी केली तेव्हा तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आणि तिने हंबरडा फोडला. कर्जाला कंटाळून धामणगाव (ता. सेलू, जि. परभणी) येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा हा हृदयद्रावक प्रसंग. श्रीकृष्ण कारभारी डख (वय 36) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

श्रीकृष्ण डख यांची बाबीस एकर कोरडवाहू शेती असून, शेतीसाठी दोन बॅंकांतून कर्ज काढले होते. सततच्या नापिकीमुळे कर्जफेड कशी करावी, या विवंचनेत ते होते.

वयोवृद्ध शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
हिंगोली - गोरलेगाव (ता. कळमनुरी) येथील शेतकरी धोंडबाराव भवानराव पतंगे (वय 82) यांनी आज सकाळी शेतात विष घेऊन आत्महत्या केली.

त्यांनी बॅंकेतून व खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जफेडीच्या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com