कर्जबाजारी शेतकऱ्याची नांदेडला आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नांदेड - सततच्या नापिकीला व कर्जाबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना नायगाव तालुक्‍यातील मोकासदरा येथे बुधवारी (ता 23.) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

नांदेड - सततच्या नापिकीला व कर्जाबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना नायगाव तालुक्‍यातील मोकासदरा येथे बुधवारी (ता 23.) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

नायगाव तालुक्‍यातील मोकासदरा येथील शेतकरी विठ्ठल संभाजी बासरे यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे. त्यावर ते आपला प्रपंच चालवीत असत. गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकी होत होती. पावसाचे प्रमाण घटल्याचा परिणाम शेतीवर झाला. उत्पादन घटल्याने विठ्ठल बासरे कर्जबाजारी झाले होते. कर्जाची परतफेड करू शकत नसल्यामुळे ते बेचैन असत. बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान कापसावर फवारण्यासाठी आणलेले विषारी औषध त्यांनी घेतले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा शेतातच मृत्यू झाला. हणमंत विठ्ठल बासरे यांच्या माहितीवरून नायगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: farmer suicide in nanded