शेतकऱ्यांचा औरंगाबाद-पुणे मार्गावर चक्‍का जाम

जमील पठाण
सोमवार, 4 जून 2018

औरंगाबाद - पुणे मार्गावरील कायगाव टोका येथे गंगापुर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास चक्‍का जाम आंदोलन केले.

कायगाव : गेल्या शुक्रवार (ता. 1) पासून सुरु झालेल्या शेतकरी संप
चिघळत चालला असून सोमवारी (ता.चार) औरंगाबाद - पुणे मार्गावरील कायगाव टोका येथे गंगापुर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास चक्‍का जाम आंदोलन केले. यामुळे दोन तास वाहतुक ठप्प झाल्याने या मार्गावर दोन्ही
बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

गंगापूर तहसील कार्यालयपुढे गेल्या शुक्रवारी शेतकऱ्यांनी दिंडी काढून
भजन आंदोलन केले होते. शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्‍के नफा धरून सस्वामिनाथन आयोगाप्रमाणे हमी भाव द्यावा, 7/12 कोरा करावा. शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी, दुधाला प्रतिलिटर 50 रुपये हमी भाव देण्यात यावा, भाकर जनावरांचे अनुदान गो शाळेला देण्याऐवजी शेतकऱ्यांना द्यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. दोन दिवसातआमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही शेतकरी गुरुवार (ता. 7) शहराकडे जाणारी रसद बंद करू असा इशारा देण्यात आला.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Farmers Chakka Jam Agitation on the Aurangabad Pune road