कर्जबाजारी शेतकऱ्याची सोनीमोहात आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

किल्लेधारूर - तालुक्‍यातील सोनीमोहा येथील शेतकरी जगन्नाथ बप्पाजी मुंडे (वय 55) यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी (ता. तीन) पहाटे घरातील छताच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी किल्लेधारूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जगन्नाथ मुंडे यांची सोनीमोहा येथे अडीच एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सततच्या नापिकीने कर्जावरील व्याज वाढत होते. सोबतच यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. कुटुंबाचा खर्च भागत नव्हता. किल्लेधारूर भारतीय स्टेट बॅंक आणि सेवा सहकारी सोसायटीचे मिळून एकूण ऐंशी हजार रुपयाहून अधिक कर्ज आहे. बॅंकेचे कर्ज आणि कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. नागनाथ तोंडे यांनी दिलेल्या माहितीवरून किल्लेधारूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंदविण्यात आला.