धर्माबाद तालुक्‍यात वीज पडून शेतकरी ठार 

31dead_body_5B1_5D.jpg
31dead_body_5B1_5D.jpg

नांदेड  :  शेतातून घराकडे परत येणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर नैसर्गीक वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बाभूळगाव (ता. धर्माबाद) शिवारात मंगळवारी (ता. २५) दुपारी तीन वाजता घडली.
 
धर्माबाद परिसरात मंगळवारी दुपारी अचानक ढग भरून आले. पहाता- पहाता वीजांचा कडकडाट सुरू होऊन पाऊस सुरू झाला. यावेळी शेतावर गेलेले शेतकरी दत्तराम दशरथ शिंदे (वय ४६) यांनी आपली म्हैस आखाड्यावर बांधून ते घराकडे निघाले. यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडली. यातच त्यांचा जागीच कोळसा होऊन मृत्यू झाला. ही माहिती माधव मारोती शिंदे यांनी धर्माबाद पोलिसांना कळविली. पोलिस आणि महसुलची मंडळी घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह धर्माबाद सरकारी रुग्णालयात दाखल केला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याचे तपासीक अमलदार श्री. निखाते यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com