रस्त्यांच्या कामात पन्नास लाखांवर फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

बीड - अंबाजोगाई तालुक्‍यातील ७३ रस्त्यांच्या कामावर तब्बल १३ हजार मजुरांची नोंद असताना प्रत्यक्षात एकही मजूर कामावर उपस्थित नव्हता. तब्बल दोन आठवड्यांपासून १३ हजार मजुरांच्या नावाने मस्टर मात्र निघत होते. यात शासनाची तब्बल ५२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तपासणी पथकांनी मनरेगा विभागाला अहवाल सादर करूनही अद्याप कोणावरच कारवाई झालेली नाही.

बीड - अंबाजोगाई तालुक्‍यातील ७३ रस्त्यांच्या कामावर तब्बल १३ हजार मजुरांची नोंद असताना प्रत्यक्षात एकही मजूर कामावर उपस्थित नव्हता. तब्बल दोन आठवड्यांपासून १३ हजार मजुरांच्या नावाने मस्टर मात्र निघत होते. यात शासनाची तब्बल ५२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तपासणी पथकांनी मनरेगा विभागाला अहवाल सादर करूनही अद्याप कोणावरच कारवाई झालेली नाही.

मनरेगामधील गैरप्रकार बीड जिल्ह्याला नवीन नाहीत. मनरेगातील गैरप्रकाराचा यापूर्वीचा कित्ताच चालू वर्षीही गिरविला जात आहे. नरेगाअंतर्गत अंबाजोगाई तालुक्‍यात रस्त्यांची ७३ कामे सुरू असल्याचे संकेतस्थळावर दाखविण्यात आले. या ७३ कामांवर तब्बल १३ हजार मजुरांची उपस्थितीही नोंदविली गेली. त्या कामाची नोंद मस्टरला घेण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र या ७३ पैकी एकाही कामावर एकही मजूर पाहायला मिळाला नाही. नरेगाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विशेष तपासणीतच ही बाब उघड झाली आहे. तब्बल १५ दिवस हा प्रकार कागदोपत्री बिनबोभाट सुरू असल्याने या पंधरा दिवसांची कागदावरील मजुरांची मजुरी ५२ लाखांच्या जवळपास होते. 

आता हे ५२ लाख मजुरांच्या माध्यमातून नेमके कोणाच्या घशात जाणार होते किंवा गेले हे स्थानिक पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र तपासणी अधिकाऱ्यांनी एवढे गंभीर मुद्दे अहवालात उपस्थित केल्यानंतरही याप्रकरणात अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. तालुक्‍यातील विविध गावांमधील या कामाची नोंद ज्या ग्रामरोजगार सेवक आणि अभियंत्यांनी घेतली, त्यांच्यावरही कुठलीच कारवाई होऊ शकली नाही. 

अंबाजोगाई तालुक्‍यातील ७३ रस्त्यांच्या कामावर प्रत्यक्षात मजूरच उपस्थित नसल्याचे तसेच बीड तालुक्‍यातील काही गावांतील कामांवरही मजूर उपस्थित नसल्याचे समोर आले असून याबाबतचा अहवालही प्राप्त झाला आहे. याप्रकरणी प्रशासकीय पातळीवरून सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. मनरेगातील दोषींची गय केली जाणार नाही.
- महेंद्रकुमार कांबळे, रोहयो उपजिल्हाधिकारी.

बीड तालुक्‍यातही पितळ उघडे
मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या जलसिंचन विहिरी, चर खोदकाम, बांधबंदिस्ती, सार्वजनिक विहीर, वृक्ष संगोपन आदी कामांवरील मजूर उपस्थितीचे बीड तालुक्‍यातील पितळही अधिकाऱ्यांच्या भेटीत उघडे पडले आहे. बीड तालुक्‍यातील नेकनूर, भंडारवाडी, कळसंबर या तिन्ही गावांतील विविध कामांवर मजूर उपस्थित नसतानाही कागदोपत्री कामे सुरू असल्याचे दाखविण्यात आल्याचे उघड झाले आहे. या तीन गावांतील कामांवर मिळून ७४४ इतके मजूर उपस्थित असल्याचे दाखविण्यात आले होते. 

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017