इंधन दरवाढीचा विरोध करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

FIR Registered against Congress Party Activist
FIR Registered against Congress Party Activist

नांदेड : पेट्रोल व डिझेल भाववाढविरोधात केलेल्या कॉंग्रेसच्या आंदोनकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी शहरातील गंगा पेट्रोलपंपावर पंतप्रधान मोदी यांच्या होर्डिंग्जवर काळे फासले होते. आयटीआय परिसरात असलेल्या गंगा पेट्रोलपंपावर कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ गुरूवारी (ता. ११) आंदोलन केले. 

आंदोलनकर्त्यांनी पेट्रोलपंपावर लावण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होर्डिंग्जला काळे फासले. सत्ताधारी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाची पायमल्ली केली. कारण जिल्ह्यात कलम ३७ (१) (३) लागू असताना उल्लंघन करणाऱ्या आंदोलकांविरूध्द पोलिस हवालदार माणिक मारोतीराव कदम यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास फौजदार किशोर कांबळे हे करीत आहेत. 

या सर्वांवर दाखल झाला गुन्हा

विठ्ठल पावडे, पप्पु कोंडेकर, अब्दुल गफार, नितीन औटेकर, सत्यजीत भोसले, अजिंक्य पवार, विवेक राऊतखेडकर, निखील पाटील यांच्यासह 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com