मंदिरात घेतली अग्निसमाधी !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

औंढा नागनाथ - हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्‍यातील सुरेगाव येथे एका व्यक्तीने शनिवारी (ता. 19) सकाळी स्वतःला पेटवून घेत अग्निसमाधी घेतल्याने खळबळ उडाली. औंढा पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून तपास सुरू आहे.

औंढा नागनाथ - हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्‍यातील सुरेगाव येथे एका व्यक्तीने शनिवारी (ता. 19) सकाळी स्वतःला पेटवून घेत अग्निसमाधी घेतल्याने खळबळ उडाली. औंढा पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून तपास सुरू आहे.

याबाबत पोलिस आणि काही नागरिकांनी दिलेली माहिती अशी, की औंढा शहरापासून जवळच सुरेगाव हे गाव आहे. येथे एक जागृत हनुमान मंदिर आहे. या मंदिरात गेल्या तीन वर्षांपासून विठ्ठल महाराज चामणीकर (वय 60) राहत होते. मंदिरापासून काही अंतरावरच गावामध्ये त्यांचे स्वतःचे घरही आहे; मात्र ते मंदिरातच राहत होते. काही वर्षांपूर्वी मंदिर परिसरात एका वानराचा मृत्यू झाला होता. या वानरावर त्याच परिसरात अंत्यविधीही करण्यात आले होते. तेथेच विठ्ठल महाराज काही दिवस झोपडी करून राहत होते. नंतर त्यांनी हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्यावर प्रवाशांना देणगी मागून त्यातून मंदिराच्या ओट्याचे काम केले, हनुमान मंदिराचे काही बांधकामही त्यांनी या पैशातून केले.

सगळे सुरळीत सुरू असतानाच शनिवारी सकाळी येहळेगाव, धार, धारखेडा, सुरवाडी या भागांतील गावकरी दूध घेऊन रस्त्याने जात असताना त्यांना मंदिर परिसरातून धूर येत असल्याचे दिसले. सुरेगावच्या गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. त्या वेळी मंदिराच्या आतील भागात सरण जळाल्याचे दिसून आले. याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचमाना आणि अन्य प्रक्रिया केली. या आगीत विठ्ठल महाराज यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरानंतर चामणीकर यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे विठ्ठल महाराज यांनी अग्निसमाधी घेतल्याची माहिती दिल्याचे औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. गणपतराव दराडे यांनी सांगितले. आग कशी लागली की स्वतः सरण रचून विठ्ठल महाराज यांनी अग्निसमाधी घेतली, याचा तपास आम्ही करत असल्याचे दराडे यांनी सांगितले.

टॅग्स

मराठवाडा

वर्चस्वाच्या लढाईत भाजपचे विजयाकडे वाटचाल; 13 विरुद्ध शुन्य मतांचा ठराव औरंगाबाद: मराठवाड्याचे लक्ष लागून राहीलेल्या औरंगाबाद...

06.18 PM

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा हिंगोलीः जिल्हयात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द...

04.00 PM

औरंगाबाद : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी मंगळवार (ता.22) रोजी...

02.33 PM