औरंगाबादमध्ये फटाका दुकानांना भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - शहरातील औरंगपूरा भागातील जिल्हा परिषदेच्या मैदानावरील सुमारे दीडशे फटाका दुकानांना आज (शनिवार) सकाळी भीषण आग लागली. या आगीत अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सर्वात मोठी फटाक्यांची बाजारपेठ अशी या ठिकाणची ओळख आहे. या मैदानावर सुमारे दीडशे फटाक्यांचे स्टॉल होते. आगीचे लोट पाच किमी अंतरावरून दिसत होते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.