दरोडेखोरांच्या मारहाणीत पाच जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

बीड - दरोडेखोरांनी धारधार शस्त्राने मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्‍कमही लुटून नेल्याची घटना गंगावाडी (ता. गेवराई) येथील शेतवस्तीवर सोमवारी पहाटे घडली. यामध्ये पाच जण जखमी झाले.

बीड - दरोडेखोरांनी धारधार शस्त्राने मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्‍कमही लुटून नेल्याची घटना गंगावाडी (ता. गेवराई) येथील शेतवस्तीवर सोमवारी पहाटे घडली. यामध्ये पाच जण जखमी झाले.

तालुक्‍यातील गंगावाडी येथील जगदीश लांडगे हे शेतात वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री जगदीश लांडगे, रुक्‍मिणबाई लांडगे, शांताबाई लांडगे व संभाजी हिंगे हे घराबाहेर झोपले होते. धनंजय लांडगे व त्यांची पत्नी सोनाली घरात होते. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी घराबाहेर झोपलेल्यांना उठवून मारहाण केली. यामध्ये जगदीश लांडगे (वय 55) रुक्‍मिणबाई लांडगे (वय 50) व शांताबाई लांडगे ( वय 70) व संभाजी हिंगे यांना लोखंडी तांबीने मारहाण करण्यात आली. गप्प बसण्याची धमकी देत दरोडेखोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. धनंजय लांडगे यांनी दरोडेखोरांना विरोध केला; मात्र दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. यात तेही जखमी झाले. या वेळी दरोडेखोरांनी तीन तोळ्यांची दोन मंगळसूत्रे, एक मोबाईल असा 68 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.