वनरक्षक भरतीत परीक्षार्थीं गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद  - वन विभागाच्या वनरक्षक पदासाठी शारीरिक पात्रता परीक्षा शुक्रवारपासून (ता.चार) सुरू झाली. मराठवाड्यासाठी विविध जिल्ह्यांत ही परीक्षा झाली; मात्र हिंगोली, ठाण्यासह विविध ठिकाणी केंद्रे असलेले काही उमेदवार औरंगाबादच्या केंद्रावर आले होते. यामुळे परीक्षार्थींमध्ये काही वेळ गोंधळ उडाला. 

औरंगाबाद  - वन विभागाच्या वनरक्षक पदासाठी शारीरिक पात्रता परीक्षा शुक्रवारपासून (ता.चार) सुरू झाली. मराठवाड्यासाठी विविध जिल्ह्यांत ही परीक्षा झाली; मात्र हिंगोली, ठाण्यासह विविध ठिकाणी केंद्रे असलेले काही उमेदवार औरंगाबादच्या केंद्रावर आले होते. यामुळे परीक्षार्थींमध्ये काही वेळ गोंधळ उडाला. 

मराठवाड्यात वनरक्षकाच्या 74 जागांसाठी 12 हजार 792 उमेदवारांनी अर्ज केले होते. यात 1709 महिला उमेदवार, तर 11 हजार 83 पुरुष उमेदवार आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शुक्रवारी ही परीक्षा घेण्यात आली. या दिवशी 713 महिला आणि दोन हजार 53 पुरुष उमेदवारांची शारीरिक पात्रता तपासणी करण्यात आली. दरम्यान, औरंगाबादच्या केंद्रावर भरतीच्यावेळी हिंगोली, ठाणे, नांदेड, बीड या जिल्ह्यांतील पन्नासहून अधिक विद्यार्थी आले होते; मात्र येथे आल्यानंतर आपले केंद्र दुसरे असल्याचे त्यांना कळाले. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना केंद्राची माहिती देऊन त्यांच्या केंद्रावर पाठविले. 

वनरक्षक पदासाठी पूर्वी विज्ञान आणि गणित असलेले उमेदवार पात्र असायचे, यावेळी त्या सोबत भूगोल आणि अर्थशास्त्र विषय असलेले विद्यार्थी पात्र ठरत असल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. या परीक्षेसाठी वन विभागाचे 125 कर्मचारी कार्यरत होते. पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, धावण्याच्या परीक्षेचे वेळापत्रक वनविभागाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. धावण्याची परीक्षा दहा ते तेरा नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती वनविभागाचे ए. पी. गिऱ्हेपूजे यांनी दिली. 

दरम्यान, शनिवारी (ता. पाच) औरंगाबाद, जालना, तसेच मराठवाड्याबाहेरील जिल्ह्यांतील 2 हजार 780 उमेदवार येणार आहेत. 

मराठवाडा

उस्मानाबाद, लातूर - उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  खामसवाडी (ता....

03.51 PM

‘संस्थान गणपती’तर्फे साकारला जाणार सजीव देखावा, विविध कार्यक्रमांचे आयोजन  औरंगाबाद - शहरातील मानाचा म्हणून परिचित...

03.45 PM

शंभर कोटींच्या ३१ रस्त्यांना अखेर शासनाची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली नियंत्रणाची जबाबदारी  औरंगाबाद -...

03.30 PM