आगीत चार मुले गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

आडूळ - विद्युत तारांच्या घर्षणामुळे घराला आग लागल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. पाच) सायंकाळी पाचच्या सुमारास पारूंडी तांडा (ता. पैठण) येथे घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. 

पारूंडी तांडा येथील विठ्ठल श्रीचंद राठोड यांच्या घराच्या एका बाजूला किराणा, तर दुसऱ्या बाजूला कापड दुकान आहे. शनिवारी दुकानात बसले असताना सायंकाळी त्यांच्या घरातून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी हे पाहून आरडाओरड करीत घराकडे धाव घेतली व घरातील वीजपुरवठा बंद केला. 

आग आटोक्‍यात आणण्यासाठी त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा रवी राठोड (वय १८), हरीश राठोड (१७), कुशाल चव्हाण (वय १६), जितेंद्र राठोड (१४) हे घरातील आग विझविताना गंभीररीत्या भाजले.  आगीची तीव्रता एवढी भयानक होती, की रवी राठोड याच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला होता. नागरिकांनी त्यांना घराबाहेर ओढून आग विझवून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेले. तांड्यावरील ग्रामस्थांनी पाण्याने आग आटोक्‍यात आणली. या आगीत घरातील टीव्ही, कपाट, फॅन, फर्निचर, कपडे यासह महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.

जीवितहानी टळली
आग लागली त्या वेळी विठ्ठल राठोड यांची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती. याच घरात स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर होता; मात्र सुदैवाने यात सिलिंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

Web Title: four boys injured in fire