मराठवाड्यात दीड महिन्यात उष्माघाताने चौघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात तापमान चाळीस अंशांच्या पुढे आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यात उष्माघाताने चौघांचा मृत्यू झाला; तर 36 जणांना उष्माघाताचा फटका बसला. 

औरंगाबाद - मराठवाड्यात तापमान चाळीस अंशांच्या पुढे आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यात उष्माघाताने चौघांचा मृत्यू झाला; तर 36 जणांना उष्माघाताचा फटका बसला. 

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी, 42 तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने उन्हाचे चटके आणि भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मार्चपासूनच उन्हाचा चटका बसण्यास सुरवात झाली होती. तापमान 40 अंशांच्या पुढे राहत असल्याने अनेकांना उन्हाचा फटका बसला आहे. शासकीय दवाखान्यात उष्माघातासाठी विशेष वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. उष्माघाताने मृत्यू झालेल्यांमध्ये बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. शासनाच्या दरबारात चौघांची नोंद असली तरी यापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. औरंगाबाद जिल्ह्यात चार, जालना एक, परभणी एक, लातूर सहा, बीड दोन, नांदेड 22 अशा 36 जणांना उष्माघात झाला आहे.