गणेश विसर्जन विहिरी कचऱ्याने भरल्या तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

औरंगाबाद :  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडक्‍या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी मैदानांची साफसफाई तसेच गणेश विसर्जनासाठी विहिरी साफ करण्याच्या सूचना सभापती मोहन मेघावाले यांनी महापालिका प्रशासनाला आज स्थळ पाहणीत दिल्या.
 

औरंगाबाद :  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडक्‍या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी मैदानांची साफसफाई तसेच गणेश विसर्जनासाठी विहिरी साफ करण्याच्या सूचना सभापती मोहन मेघावाले यांनी महापालिका प्रशासनाला आज स्थळ पाहणीत दिल्या.
 

महापालिका प्रशासनाकडून मात्र विसर्जन विहिरींतील गाळ काढण्याच्या कामाला दरवर्षी उशीर केला जातो. यावेळी तसे होऊ नये, यासाठी स्थायी समिती सभापती मेघावाले यांनी शहरातील सर्व विसर्जन विहिरींची रविवारी (ता.14) पाहणी केली. एन-12 स्वामी विवेकानंदनगर, चिकलठाणा, मुकुंदवाडी, संतोषीमातानगर-मुकुंदवाडी, औरंगपुरा, शिवाजीनगर गारखेडा या भागातील सर्वच विसर्जन विहिरी गाळ व कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आढळल्या. तसेच विहिरींच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा व घाण पडलेली होती. पाहणीदरम्यान सभापतींनी विहिरींमधील गाळ काढण्याची प्रक्रिया लवकर सुरू करावी, अशा सूचना केल्या. नगरसेवक कैलास गायकवाड, स्वाती नागरे, सीमा खरात, कमलाकर जगताप, कमल नरोटे, बबिता चावरिया, कीर्ती शिंदे, मनोज गांगवे, वैशाली जाधव यांच्यासह
 

महापालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सिकंदर अली, अभियंता के. डी. देशमुख, बी. डी. फड उपस्थित होते.

मराठवाडा

किमतीमध्ये वाढ - पूर्वी होता केवळ पाच टक्के, आता २८ टक्के कर औरंगाबाद - घरगुती गणपतीची सजावट करण्यासाठी थर्माकोलला मोठी...

10.12 AM

पंप हाऊसमध्ये पुन्हा बिघाड - रविवारचे पाणी आज मिळणार औरंगाबाद - जायकवाडी पंप हाऊसमध्ये महापालिकेच्या विद्युत केंद्राचा...

10.12 AM

दोन दिवसांत ७६ मिमी पावसाची नोंद ः जिल्ह्यातही बरसल्या सरी औरंगाबाद - ‘क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे...’...

10.12 AM