मोदकोत्सवानिमित्त जणू यात्रा!

हिंगोली - दर्शन रांगेत भाविकांची गर्दी.
हिंगोली - दर्शन रांगेत भाविकांची गर्दी.

हिंगोली - शहरात विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या मोदकोत्सवासाठी रविवारी (ता. २३) राज्यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले. लाखो भाविकांच्या हजेरीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी मंदिरातर्फे मोदकोत्सवाचे आयोजन केले होते. मराठवाडा, विदर्भ व राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात भाविकांनी एक दिवस आधीच हजेरी लावली. शनिवारी (ता. २२) हजारो भाविकांनी रांग लावून दर्शन घेतले. रविवारी पहाटे चारपासून पुन्हा रांगा लागल्या होत्या. सकाळी सहाला चिंतामणी देवस्थानतर्फे कयाधू नदीपर्यंत कावडयात्रा काढण्यात आली. कयाधूचे जल घेऊन ही यात्रा मंदिरापर्यंत आली. त्यानंतर महापूजा झाली. नवसाच्या मोदकांचे वाटप सुरू झाले. महोत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून दर्शन मंडप उभारला होता. बॅरिकेट्‌स लावून रांगा केल्या होत्या. रांगेतील भाविकांना मोफत चहा, नाश्‍ता, दूध व भोजनाची व्यवस्था केली होती.

मोफत भोजन व्यवस्था
राजस्थान गणेश मंडळातर्फे बालाजी मंदिरामध्ये भाविकांना भोजनाची व्यवस्था होती. इडली, भेळ, उसळ, नॉयलॉन चिवडा, पोहे, पुरी-भाजी, साबुदाणा वडा, बटाटा वडा, मोदक यासह फराळाच्या पदार्थांचे भाविकांना मोफत वाटप केले जात होते. शहरातील प्रत्येक गणेश मंडळाने खाद्यपदार्थांची सोय केली होती. याशिवाय लहान मुलांसाठी दूध, फळांचे वाटप करण्यात आले.

असाही उपक्रम
ऑटोरिक्षा चालकांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणांवरून आलेल्या भाविकांना दर्शन रांगेपर्यंत मोफत सोडण्याची व्यवस्था केली होती. तसेच बाहेरगावांहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी एनटीसी, रामलीला मैदान, लाला लजपतरायनगर येथे पार्किंगची व्यवस्था होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com