विजेच्या लपंडावाने वैतागले गेवराईकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

गेवराई - शहरातील सर्वच भागांत गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; मात्र विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. 

गेवराई - शहरातील सर्वच भागांत गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; मात्र विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. 

शहरातील शिवाजीनगर, गणेशनगर, गजानननगर, भगवाननगर, सरस्वती कॉलनी, माऊली नगर, महात्मा फुले नगर, अहिल्यानगर, तसेच जुनी गेवराई भागात गेल्या चार दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रभर वीज गुल होत असल्याने नवीन गेवराई भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. वीज कंपनीचे कर्मचारी फोन उचलत नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून पावसामुळे अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: georai marathwada news electricity supply issue