फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

गेवराई - कपाशीवर फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. विष्णू छबन घाडगे (वय 28, रा. मन्यारवाडी, ता. गेवराई ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. येथून जवळच असलेल्या गोविंदवाडी शिवारात ते फवारणीसाठी गेले होते. या शेतकऱ्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
टॅग्स