शेतकऱ्यांना खूशखबर...उन्हाळी हंगामासाठी मिळणार पाणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

लातूर - लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक एकअंतर्गत सर्व प्रकल्पांच्या सर्व लाभधारकांना उन्हाळी हंगाम 2016-17 मध्ये संबंधित प्रकल्पातील पाणीसाठा उपलब्धतेनुसार, प्रकल्पीय पीक रचनेनुसार पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी पाणीअर्ज नमुना सात व सात अ संबंधित शाखा अधिकारी यांच्या कार्यालयास ता. 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन या विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

कमी पाण्यात येणारी व उन्हाळी हंगामी पिके कालावधी ता. एक मार्च ते 30 जून या दरम्यान कालवा सल्लागार समितीने मंजूर करण्यात आल्यानुसार पाणीपातळीचे नियोजन केले जात आहे. ज्या जमिनीसाठी पाणी मागणी करावयाची आहे त्या जमिनीचा (वहीवाटदार) मालक अथवा 

सामायिक मालक असणे गरजेचे आहे. ज्या मुदतीसाठी पाणी अर्ज द्यावयाचा आहे त्या कालावधीत ती जमीन त्याच्या वहीवाटीस असली पाहिजे. पाणी अर्जासोबत मागील थकबाकी पूर्ण भरावी व रीतसर पावती घ्यावी, पाणी अर्जासोबत साताबारा उतारा किंवा खाते पुस्तिका सादर करावी, पाणी मागणी अर्ज 20 आरच्या पटीत असावेत, तसेच अर्जासोबत थकबाकी पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी अर्ज मंजूर करण्यात येतील. पाणीअर्ज मंजूर झाल्यानंतर मंजूर पिकास पाणी घ्यावे व सोबत पाणी पास ठेवावा. आपापल्या हद्दीतील शेतचारी दुरुस्तीची जबाबदारी संबंधित बागायतदाराची राहणार आहे. शेतचारी नादुरुस्त असल्यास मंजुरी दिली जाणार नाही व पाणी दिले जाणार नाही. 

प्रचलित पाणीपट्टीच्या दराने आकारणी करण्यात येणार आहे. त्यावर वीस टक्के स्थानिक कर आकारला जाणार आहे. नियोजित कोट्यापेक्षा जास्त पाणी सिंचनासाठी वापरता येणार नाही. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन या विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

...तर होईल दंड 
एखाद्या शेतकऱ्याने मंजुरीपेक्षा जास्त क्षेत्र सिंचित केल्यास हंगामी दराच्या सव्वापट दराने आकारणी केली जाणार आहे. पाणीअर्ज न देता पाणी घेतल्यास बिनअर्जी क्षेत्राचे पंचनामे करून दंड आकारणी होणार आहे. मंजूर कालावधी सोडून मोटारी चालू ठेवल्यास विद्युत पुरवठा खंडित करणे, मोटारी जप्त करणे, पाणीपरवाना रद्द करणे व बिगर पाळी पंचनामा करणे अनिवार्य ठरणार आहे.