पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

नळदुर्ग - पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने पेपर अवघड गेल्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 17) खंडाळा प्रकल्प (ता. तुळजापूर) येथे सकाळी नऊच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, हंगरगा (नळ, ता. तुळजापूर) येथील इंदिरानगर येथे राहणारी तरुणी रेणुका रेवणसिद्ध राठोड (वय 18) ही बी.एस्सी. पदवीची विद्यार्थिनी अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात परीक्षा देत होती.

गुरुवारी (ता. 16) केमेस्ट्रीचा पेपर अवघड गेल्याने ती निराश झाली होती. शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता पेपरला जाते म्हणून ती घरातून निघून गेली. दरम्यान, तिने खंडाळा प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. यामुळे विद्यार्थ्यांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पंचनामा करून नळदुर्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल एन. एस. बांगर तपास करीत आहेत.

Web Title: girl student suicide