व्यवसायाला द्या शिक्षणाचा भक्कम पाया - प्रियदर्शन जाधव 

Abhinata-jadhav.jpg
Abhinata-jadhav.jpg

औरंगाबाद : "ज्या क्षेत्रात काम करू इच्छिता त्यास शिक्षणाचा भक्कम पाया द्या, शिक्षणाविना कोणत्याच व्यवसायाची वृद्धी होऊ शकत नाही म्हणून त्यामुळे शिक्षण केवळ नोकरी लागण्यासाठीच घेऊ नका" असे मत अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनी व्यक्त केले.

यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क "यिन" समर युथ समिट २०१८ दरम्यान तरुणाईला मार्गदर्शन करताना मंगळवारी (ता. १२)  ते बोलत होते. मुंबई पुणे शहराचा झगमगाट पाहून दडपण येणे साहजिक आहे मात्र कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपण खेडे गावातून, छोट्या शहरातून पुणे, मुंबईत आलो ही भावना मनातून काढून टाका.
 

खरेतर ग्रामीण भागातील मुलामुलींचा सर्वांगीण विकास झालेला असतो, सर्व प्रकारच्या समस्या जवळून अनुभवलेल्या असतात त्यामुळे त्यांच्यात खच्चून "टॅलेंट" भरलेले असते. या सर्व गोष्टीमुळेच मी तब्बल ८० एकांकिकाचे दिग्दर्शन, मस्का  हा पहिला चित्रपट करू शकलो, तसेच  मुंबईसारख्या शहरात जम बसवू शकलो असेही श्री जाधव म्हणाले. प्रत्येक क्षेत्रात धडाडीने घुसा मात्र नम्रता, आत्मविश्वास याशिवाय काहीच शक्य होत नाही. 

टाईमपासच्या डायलॉगने आणली रंगत

कार्यक्रमादरम्यान मुलांनी श्री जाधव यांना टाईमपास चित्रपटातील डायलॉग म्हणण्याची विनंती केली त्यावर जाधव यांनी म्हटलेल्या हिंदी विनोदावर सभागृह खळखळून हसले. यावेळी तरुणाईने कला, नाट्य आदी विविध करिअरविषयक प्रश्नांची उकल करून घेतली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com