शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

लातूर - काही दिवसांपासून बंद असलेली शासकीय तूर खरेदी आता सुरू झाली आहे. शासनाने या खरेदीला ता. 22 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली; पण लातूर येथे केवळ चारच दिवस मिळणार आहेत. तर दुसरीकडे बाजार समितीच्या अडत बाजारात मात्र आठव्या दिवशीही तुरीचा सौदा निघू शकला नाही. त्यामुळे बाजारात तुरीची आवक झाली नाही. 

गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. पाच दिवसांपूर्वी शासकीय खरेदी केंद्रांवर असलेल्या तुरीचे माप होत नाही तोपर्यंत तुरीची आवक खरेदी करू नये, असा आदेश सरकारने दिला होता. त्यामुळे या खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी केली जात नव्हती. बाजार समितीने आठ दिवसांपूर्वी हमी भावापेक्षा कमी भावाने तुरीची खरेदी केली, तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. व्यापाऱ्यांना तशा नोटिसाही दिल्या आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून अडत बाजारात तुरीचा सौदाच निघालेला नाही. या प्रकारात तूर उत्पादक शेतकरी मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यात आता सरकारने 22 एप्रिलपर्यंत तुरीची खरेदी करावी, असा आदेश शासकीय खरेदी केंद्राला दिले आहेत.