सरकारला दंगलीचे गांभीर्य अद्यापही जाणवले नाही का? 

सरकारला दंगलीचे गांभीर्य अद्यापही जाणवले नाही का? 

औरंगाबाद - मंत्री, पदाधिकाऱ्यांच्या लग्नकार्याला औरंगाबादेत वारंवार हजेरी लावणारे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री एवढी भीषण दंगल झाली तरीही अद्याप शहरात फिरकले नाहीत. विशेषत: पूर्णवेळ पोलिस आयुक्त लवकरच नेमू, अशी पोकळ आश्‍वासने आतापर्यंत मिळाली. त्यामुळे दंगल भडकल्यानंतरही सरकार चिडीचूप असून, या घटनेचे गांभीर्य आहे की नाही, असा सवाल औरंगाबादकर करीत आहेत. 

औरंगाबाद संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. शहराला दंगलीचा मोठा इतिहास आहे. कचरा प्रश्‍न चिघळल्यानंतर मिटमिटा येथे मोठा जनक्षोभ झाला. यानंतर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या सुटीवर पाठविण्याचा निर्णय झाला. एक महिन्यात समिती स्थापन करून कारवाई करू, अशी घोषणा विधानसभेत केली; परंतु ही घोषणा हवेतच विरली. मिटमिटा येथे शेकडो लोकांच्या वाहनांचे, घरांचे नुकसान झाल्यानंतरही कोणतीही समिती आली नाही, पाहणीही झाली नाही. त्या वेळी पूर्णवेळ पोलिस आयुक्तांची नियुक्ती लवकरच करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत दिले होते. त्याला एक महिना उलटला. मंत्र्यांनीही अशीच आश्‍वासने दिली होती. 

आता दंगलीने जुने शहर धुमसत राहिले. यात दोन बळी गेले, कोट्यवधींच्या सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले. त्यामुळे सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सलोखा, स्थैर्य राखण्यासाठी औरंगाबादेत येण्याची गरज होती. मुख्यमंत्री आले असते तर दंगलीत होरपळलेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला असता; परंतु गृहविभागाचा अतिरिक्त पदभार स्वीकारणारे मुख्यमंत्री शहरात अजूनही फिरकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com