नांदेड - आजोबाच्या बँक खात्यातील साडेदहा कोटी रुपयाचा अपहार

नांदेड - आजोबाच्या बँक खात्यातील साडेदहा कोटी रुपयाचा अपहार

नांदेड - आजोबाच्या नावे असलेल्या बँक खात्यातील साडेदहा कोटी रुपयाचा अपहार करून नातेवाईकाची फसवणूक करणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वजिराबाद भागात हरीश ठाकूरदास रीजवानी यांचे अन्य नातेवाईक यांच्यात मागील अनेक वर्षापासून संपत्तीच्या वाटणीवरून वाद आहे. या कुटूंबीयांचे प्रमुख नवलराम रिजवानी यांच्या नावे दारु दुकानाचा (लीकर) परवाना होता. त्यांचे नवीन मोंढा भागात ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेत खाते आहे. खात्यात १० कोटी ६३ लाख ३६ हजार ८७३ रुपये एकत्रीत कुटूंबाचे होते. परंतु, ही रक्कम व अन्य संपतीची वाटणी करण्यासाठी त्यांच्यात व नातेवाईकांमध्ये बेबनाव झाला. यावेळी हरिष रिजवानी यांनी नांदेड न्यायालयात न्याय मागितला. अखेर न्यायालयाने शिवाजीनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

यावरून पोलिसांनी अर्जूनदास नवलराम रिजवानी, धनराज नवलराम रिजवानी, मायादेवी किशनदास रिजवानी, सुधिरादेवी अर्जूनदास रिजवानी आणि भारत धनराज रिजवानी यांच्याविरूध्द फसवणूकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार डी. एन. काळे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com