मुस्तापूरे कूटूंबियाला पालकमंत्र्यांनी केली एक लाखाची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

परभणी : हुतात्मा जवान शुभम मुस्तापूरे यांच्या कुटूंबींची सोमवारी (ता. 9) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घरी जाऊन​ भेट घेतली. कुटूंबीयांना पालकमंत्र्यांनी 1 लाख रुपयांची रोख मदत केली. 

परभणी : हुतात्मा जवान शुभम मुस्तापूरे यांच्या कुटूंबींची सोमवारी (ता. 9) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घरी जाऊन​ भेट घेतली. कुटूंबीयांना पालकमंत्र्यांनी 1 लाख रुपयांची रोख मदत केली. 

हुतात्मा जवान शुभम मुस्तापूरे यांच्या कुटूंबियाची सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली. यावेळी खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हा प्रमुख विशाल कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्र्यांनी मुस्तापूरे कुटूंबाची सांत्वन केले. त्यांना एक लाख रुपयांची रोख मदत ही दिली. कोनरेवाडी गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी हे गाव पालम शहराशी जोडल्या जावे यासाठी तात्काळ या गावाचा रस्ता दुरुस्त करावा असे आदेश दिले.

Web Title: guardian minister helps mustapure family with 1 lack