"साडे तीन सौ साल, गुरूगोविंदसिंगजी के साथ' 

gurugovindsingh
gurugovindsingh

औरंगाबाद -  शीख धर्माचे दहावे गुरू श्री गुरूगोविंदसिंगजी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील चारही गुरुद्वारांच्या प्रबंधक समितीतर्फे पंचप्याऱ्यांच्या नेतृत्त्वामध्ये शहरात वाहन फेरी काढण्यात आली. यावेळी "साडे तीन सौ साल, गुरूगोविंदसिंगजी के साथ' आणि "जो बोले सो निहाल, सत्‌श्री अकाल' या घोषणांनी शहर सोमवारी (ता.2) दुमदुमले. 

सकाळी अकराला उस्मानपुऱ्यातील गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा येथून वाहन फेरीला सुरवात झाली. त्यानंतर ही फेरी क्रांतीचौक, पैठणगेट, सिटीचौक मार्गे धावणी मोहल्ल्यातील भाईसाहब भाई दयालसिंग धरमसिंग या गुरुद्वारापर्यंत आली. जिल्हाधिकारी कार्यालय, टीव्ही सेंटर, बजरंग चौक, एन-3 चौक, जालना रोड मार्गे सिंधी कॉलनीतील श्री गुरू तेगबहादूर लंगर साहब येथे फेरी विसर्जित करण्यात आली. यामध्ये दोनशे दुचाकी, तर 50 कारचा सहभाग होता. पुरुष पांढरा ड्रेस आणि केसरी किंवा निळी पगडी, तर महिला पांढरा ड्रेस आणि निळा किंवा केसरी दुपट्टा परिधान करून सहभागी झाल्या होत्या. आठशे ते हजार बच्चेकंपनी, महिला-पुरुष आणि वयोवृद्धांनी या फेरीत सहभाग घेतला होता. फेरीत सुरवातीला पंचप्याऱ्यांचे वाहन, मागे गुरूगोविंदसिंग यांची प्रतिमा असलेले वाहन, त्यामागे दुचाकी आणि चारचाकी होत्या. प्रत्येक वाहनावर असलेले निशानसाहब (झेंडा) लक्ष वेधून घेत होते. यावेळी तिन्ही गुरुद्वारांचे अध्यक्ष जगदेवसिंग गुद्दला, नरेंद्रसिंग जाबिंदा आणि हरविंदरसिंग बिंद्रा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील व्यापार उद्योग शासकीय, राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. 

मंगळवारी (ता.तीन) धावणी मोहल्ला गुरुद्वारा येथे जसबीरसिंग रियार यांचे कीर्तन आणि हरप्रितसिंग कौर यांचे रास आधारित कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. चार जानेवारी रोजी बीबी बलबीर कौर छाबडा या मुलांना शीख धर्माच्या उज्ज्वल इतिहासाची माहिती देतील. यावेळी हस्तकलांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. यानंतर ग्यानी भाई खडकसिंगजी यांचे कथा वाचन होईल. रात्री समशेरसिंग आणि शिवचरणसिंग यांची कीर्तने होतील. त्यानंतर रात्री श्री. गुरुगोविंदसिंग यांच्या जन्मदिनानिमित्त प्रकाश पूरम कार्यक्रम साजरा करण्यात येईल. पाच जानेवारी रोजी विशेष दिवाण हजुरी कीर्तन होईल. 

अन्याय-अत्याचार सहन करू नये 
श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथे मनजित कौर यांचे मंडळ आणि लुधियानाहून आलेले भाई जसबीरसिंग रियार सायंकाळी झालेल्या कीर्तनात म्हणाले की, शीख धर्मियांसह सर्वांनी बंधुभावाने राहण्याचा मोलाचा सल्ला गुरुगोविंदसिंगजी यांनी दिला आहे. त्याचे अनुकरण सर्वांनीच करायला हवे. गुरुद्वारामध्ये भजन आणि कीर्तनासह व्यवसाय वाढीसाठीही प्रयत्न करायला हवा, कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार कुणीही सहन करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com