पेटवायची हौस असेल, तर गरिबांच्या चुली पेटवा : डॉ. सय्यद रफिक

Help Poor Peoples says Dr Sayyed Rafiq
Help Poor Peoples says Dr Sayyed Rafiq

औरंगाबाद : लोकांना जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म आहे. सर्व माणसे एकाच आईबापाची लेकरे आहेत. त्यामुळे समाजासमाजात वाद पेटवू नका. पेटवायची फारच हौस असेल, तर गरिबांच्या चुली पेटवा, असा संदेश जमाते इस्लामी हिंदचे प्रचारक डॉ. सय्यद रफीक पारनेरकर यांनी दिला. देशात बंधूभाव, शांतता, न्याय, नीती प्रस्थापित होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. 

'सकाळ' आणि 'जमाते इस्लामी हिंद' यांच्या वतीने शनिवारी (ता. 13) ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, युनिट हेड रमेश बोडके, जमाते इस्लामीचे शहर अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही, काझी मकदूम मोहियोद्दीन, वाजेद कादरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा ऑडिओ संदेश उपस्थितांना ऐकवण्यात आला. जमाते इस्लामीचे मराठी प्रचारक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांचे मुख्य व्याख्यान झाले.

ते म्हणाले, की आज समाजात अनेक दुखणी आहेत. मुले आईबापाला विचारत नाहीत. सर्वत्र भ्रष्टाचार आहे. गरिबांची काळजी कुणाला नाही. बेईमान लोकांचा सुळसुळाट झाला आहे. असे एखादे अँटी करप्शन व्हॅक्‍सिन निघाले पाहिजे, की ज्याची लस लहानपणीच बाळाला टोचली, तर ते आयुष्यात कधी भ्रष्टाचार करणार नाही. परंतु असे इंजेक्‍शन आस्तित्वात येणे शक्‍य नसले, तरी असे ईद मिलनसारखे कार्यक्रम समाजाला चांगला संदेश देऊन लसीकरणाचेच काम करतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

शहरातील अस्वस्थ वातावरणात समाजासमाजांत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी "सकाळ' दरवर्षी असे उपक्रम राबवित असल्याचे सांगत संजय वरकड यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. फेरोज पठाण यांनी केले. भर पावसातही कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वधर्मीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com