गोळी लागून घरकामगार गंभीर जखमी 

Firing
Firing

सोनपेठ : सोनपेठ शहरात एका माजी पोलीस उपाधिक्षकाच्या घरी घरकाम करणाऱ्या कामगारास गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असुन त्यास अधिक उपचारासाठी आंबाजोगाई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या जय्यत तयारीत असलेल्या सोनपेठ शहरात आज (ता.22) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील विटा रोडवर राहणाऱ्या माजी पोलीस उपाधिक्षक सीताराम पवार यांच्या घरी काम करणाऱ्या सुनील विश्वनाथ मुंडे (वय 23) यास गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्यास आंबाजोगाई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गोळी कशी लागली? कोणी मारली? या बाबत काही माहिती मिळु शकली नाही. सोनपेठ पोलिसात या घटनेची अधिकृत नोंद नसली तरी पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या बाबत सोनपेठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी आंबाजोगाई येथुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे  सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com