उन्हाच्या कडाक्‍याने गेवराई तालुक्‍यात रस्ते ओस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

गेवराई - गेल्या चार दिवसांत तालुक्‍यातील उन्हाचा पारा जवळपास 40 अंशांवर राहिला असून, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. दरम्यान उन्हाच्या कडाक्‍याने ग्रामीण भागात दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल झाला आहे. दुपारच्या सुमारास तर रस्ते ओस पडत आहेत. ग्रामीण भागात शेतातील कामे करण्यासाठी सकाळीच नागरिक जात आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून गेवराई तालुक्‍यात उन्हाच्या तीव्र झळा अधिक बसू लागल्या आहेत. तापमानाची ही पातळी सलग चार दिवस कायम आहे. त्यामुळे उन्हाच्या कडाक्‍याने बहुतांश नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेरच न जाणेच पसंत केले आहे. यामुळे प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत व्यवहार थंडावत आहेत. अशीच परिस्थिती ग्रामीण भागातही आहे. कडाक्‍याच्या उन्हामुळे शेतात काम करणारे शेतमजूर सकाळी लवकर शेतात जाऊन दुपारी एक वाजेपर्यंत काम करून शेतातील झाडांच्या सावलीत विसावा घेताना दिसतात. 

साडेचारनंतर पुन्हा सायंकाळी सात वाजेपर्यंत काम करतात. दुपारच्या काळात नागरिक टोपी किंवा उपरणे डोक्‍यावर घालून बाहेर पडतात. 

गेल्या काही दिवसांत शहरातील प्रमुख चौकांत शीतपेय, आईस्क्रिम पार्लर, रसवंती, लिंबू सरबताची दुको थाटली गेलीत. या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. शहरी भागात अद्याप टंचाई अजून जाणवत नसली, तरी तालुक्‍यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे. 

भारनियमनाची त्रासात भर 
तालुक्‍यात भारनियमनाने नागरिक त्रस्त आहेत. उन्हाची तीव्रता शिगेला पोहोचली असताना कधीही वीज गुल होत आहे. शिवाय ग्रामीण भागात सलग कित्येक तास भारनियमन असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. 

Web Title: High temperature in gevrai

टॅग्स