बनावट नोटांच्या नावाखाली फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

हिंगोली - बनावट नोटा तयार करून देतो, असे म्हणून पाच लाख रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला असून, मुख्य संशयितासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली - बनावट नोटा तयार करून देतो, असे म्हणून पाच लाख रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला असून, मुख्य संशयितासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या आठवड्यात भटसावंगी तांडा येथे लक्ष्मण रामजी बोडखे हे ऊसतोड मुकादम मजुरांची शोधाशोध करत होते. त्यांना विलास गिरी भेटला. त्याने बनावट नोटा तयार करणाऱ्याला भेटण्यासाठी बोडखे यांना सिरसम येथे नेले. तेथे संशयित संतोष जगदेव देशमुख (रा. वाकी, ता. हदगाव जि. नांदेड) याने पाटील हे बनावट नाव सांगून बोडखे यांच्यासोबत चर्चा केली.

पाच लाखांच्या नोटाच्या बदल्यात वीस लाखांच्या नोटा देतो, असे सांगितले. बोडखे या आमिषाला भुलले आणि पाच लाख रुपये संतोष देशमुखला दिले. त्या बदल्यात वीस लाख रुपये आणून देतो म्हणून बाजूला गेला. तितक्‍यात तेथे पोलिसांची गाडी तेथे पोचली. एका जण त्यातून उतरला. "तुमच्या बॅगमध्ये दारू आहे, तुमच्यावर केस करतो,' असे बोडखे यांना धमकाविले. देशमुख या गाडीत बसून पळून गेला. यानंतर बोडखे यांनी बासंबा पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली.

टॅग्स