हिंगोली ते कनेरगाव राज्य महामार्गावर अपघातात एक ठार एक जखमी

हिंगोली ते कनेरगाव राज्य महामार्गावर अपघातात एक ठार एक जखमी

कनेरगाव नाकाः हिंगोली ते कनेरगाव नाका राज्य महामार्गावर डेंन्टल कॉलेज जवळ हिंगोली कडून कनेरगाव कडे जाणाऱ्या बुलेटला एका ट्रक ने धडक दिल्याने बुलेटवरील एकाचा मृत्यू झाला असून अन्य एकजण जखमी झाला आहे.

राजू ग्यानबा अढाव (वय वर्ष ४२, रा. ब्राह्मणवाडा ता. जि. वाशीम) हे जागीच ठार झाले तर त्यांचा मित्र ज्ञानेश्वर अशोक येवले (वय ३८ रा. ब्राम्हण वाडा ता. जि, वाशीम) हे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघेही वाशिम तालूक्यातील ब्राम्हणवाडा (हिरवे) येथील राहणारे आहेत. सदरील घटना हिंगोली ग्रामीण हद्दीत गुरुवारी (ता. 7) सायंकाळी 7:30 दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक जगदीश भंडारवार, ए एस.आय.पोटे, शेषराव पोले, शेख जावेद, नंदकुमार मस्के ,सतिश जाधव, रणखांब ठाकुर यांनी भेट देऊन जखमीस तातडीने उपचारासाठी हलवून वाहतुक सुरळीत केली.

हिंगोली ते कनेरगाव नाका हा राज्यरस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे अतिशय अवघड झाले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याने हैद्राबाद ते दिल्ली, चैन्नई ते इंदौर, नांदेड-अकोला, परभणी-अमरावती-नागपूर या मार्गावरील शेकडो वाहने धावतात. यामध्ये एसटी, ट्रकसह अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची अशःरक्ष चाळणी झाली आहे. हिंगोली पासून ते माळहिवरा या गावापर्यंत जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामधून वाहन चालविताना वाहनधारकास तारेवरची कसरत करावी लागत आहे. बासंबा ते कलगाव दरम्यान तर रस्त्यात खड्डा का खड्ड्यावर रस्ता हेच कळत नाही. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे गाव सुध्दा याच रस्त्यावर आहे. मात्र, त्यांचे सुध्दा याकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे व रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या भरण्याची मागणी या भागातील नागरिक तसेच ञस्त वाहत धारकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com