हिंगोली: एक मराठा लाख मराठाच्या घोषणांची दुमदुमले शहर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मराठा बांधवांची हिंगोलीत दुचाकी फेरी

हिंगोलीः येथे मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमिवर आज (शनिवारः) काढण्यात आलेल्या रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी शहर दुमदुमले होते. मुंबई येथील मोर्चास मोठ्या संख्येने हजर राहण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा समाजातर्फे मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी हिंगोलीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाभरातून मराठाबांधव सहभागी झाले होते. मुंबई येथे मोर्चासाठी ता. ७ ऑगस्ट हिंगोलीतून रवाना होण्याचे ठरविण्यात आले. हिंगोली जिल्हयातील वाहनांसाठी पनवेल व खारघर येथे पार्कींगची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले तर त्या ठिकाणी काही अडचणी आल्यास त्या ठिकाणी नियुक्‍त केलेल्या स्वयंसेवकांशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी या आरक्षण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, या बैठकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली. रिसालाबाजार, अंतुलेनगर, रेल्वेस्टेशन रोड, तहसील कार्यालय, पोस्ट ऑफीस रोड, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. यावेळी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: