मंगलाष्टके मंडपात अन् लग्न पोलिस ठाण्यात

सय्यद अतिक
सोमवार, 29 मे 2017

किरकोळ वादाने मंगलाष्टके थांबली, नवरदेव रुसला
काही वऱ्हाडी मंडळीचा आपसात किरकोळ वाद झाल्याने उर्वरित मंगलाष्टे थांबविण्यात आली. यामुळे अपशकून झाला म्‍हणून नवरेदव रुसला व त्‍याने पलायन केले.

आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर येथील मंगल कार्यालयात सोमवारी (ता. २९) सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात दोन मंगलाष्टके झाल्यानंतर किरकोळ वाद झाल्याने पुढची मंगलाष्टके थांबविण्यात आली. त्‍यांनतर नवरदेव हे लग्न करणार नसल्याची भूमिका घेण्यात आली. त्‍यानंतर काहींनी मधस्‍थी केल्यानंतर अर्धवट झालेली लग्नाची मंगलाष्‍टके पोलिस ठाण्यात पूर्ण करण्यात आली.

आखाडा बाळापूर येथील कुसुमताई सभागृहात सोमवारी (ता.२९) सकाळी अकरा वाजता बाळापुर येथील बाळु महाराज धोतरे यांची कन्या कविता हिचा विवाह हिंगोली तालुक्‍यातील नांदुरादेवी येथील हरिभाऊ शिंदे यांचा मुलगा ब्रम्‍हा यांच्यासोबत ठरला होता. त्‍याप्रमाणे वधू व वराकडील मंडळींनी लग्नाची संपूर्ण तयारी केली. मूळ पत्रिका, मंगल कार्यालय, बँड, आचारी ठरवून किराणा सामान, कपडे व इतर साहित्‍य उपलब्ध केले होते.

ठरल्याप्रमाणे सोमवारी (ता.२९) सकाळी अकरा वाजता विवाह सोहळा सुरू झाला. दोन मंगलाष्टके झाली हा कार्यक्रम सुरू असताना काही वऱ्हाडी मंडळीचा आपसात किरकोळ वाद झाल्याने उर्वरित मंगलाष्टे थांबविण्यात आली. यामुळे अपशकून झाला म्‍हणून नवरेदव रुसला व त्‍याने पलायन केले. शेवटी पोलिसांनी मध्यस्‍थी केली नवरदेवाची व वधूकडील मंडळींची समजूत घालून हे प्रकरण मिटविले व पोलिस ठाण्यात अर्धवट झालेली मंगलाष्टके पूर्ण करून विवाह संपन्न झाला.
या वेळी सहायक पोलिस निरिक्षक जी. एस. राहीर, जमादार संजय मार्के, पोलिस पाटील धुव्रकुमार पंडीत, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत डुकरे, प्रशांत सूर्यवंशी, वैजनाथ हेंद्रे, सचिन बोंढारे, रामभाऊ जाधव, रमण शिंदे, सटवा चिंचोके, अण्णा जाधव आदींची उपस्‍थिती होती. पोलिस ठाण्यात लग्न लागत असल्यानें येथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्‍थित झाले होते.

'ई सकाळ'वरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सापाने दंश केल्याने बालकाचा मृत्‍यू 
गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर
योयो परत येणार रे..!!
इंग्रजी शाळांत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश
इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प
...आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!
दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री
मॉन्सून आणि मार्केट
आजच्या काळात तुमची खरी कसोटी : विद्यासागर राव
सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात