पावसासाठी मुस्‍लिम बांधवांकडून  प्रार्थना

संजय कापसे
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पावसाळा सुरु झाल्‍यानंतही अद्यापपर्यंत पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही, परिणामी शेतातील उभी पिके करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोबतच पशुपक्ष्यांच्‍या चारा व पाण्याचा प्रश्‍नही गंभीर वळणार येवून ठेपला आहे.

कळमनुरी : चांगले पर्जन्‍यमान व्‍हावे, पशुपक्ष्यांना पाणी व चारा उपलब्‍ध व्‍हावा, देशात सर्वत्र शांतता राहावी यासाठी शहरातील मुस्‍लीम बांधवांनी रविवारी (ता.13) विशेष सामूहिक प्रार्थना केली.

पावसाळा सुरु झाल्‍यानंतही अद्यापपर्यंत पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही, परिणामी शेतातील उभी पिके करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोबतच पशुपक्ष्यांच्‍या चारा व पाण्याचा प्रश्‍नही गंभीर वळणार येवून ठेपला आहे. या परिस्थितीत चांगले पर्जन्‍यमान होवून शेती व पशुपक्ष्यांसाठी चारापाणी उपलब्‍ध व्‍हावे व देशात सर्वत्र शांतता व्‍हावी याकरीता मुस्‍लीम बांधवांनी येथील रजा मैदान येथून अनवाणी पायाने इदगाह येथे जात विशेष सामूहिक प्रार्थना केली.

यासाठी मौलाना मुफ्ती अ.हफीज, मौलाना अयुब बरकाती, मौलाना हफीज शाकेर, मौलाना शाकेर रजा, मौलाना हसनैन रजा, मौलाना हाफेज अयुब यांच्‍यासह हुमायून नाईक, इलियास नाईक, आवेस नाईक, इमरान नाईक, अर्शद नाईक, अन्‍वर नाईक यांच्‍यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्‍थिती होती