हिंगोली : झाड अंगावर पडून नर्सी नामदेवमध्ये 3 मजूर जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

 वादळी वाऱ्यासह पाऊस

वादळी वाऱ्याने गावातील अनेकाच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने काही काळ गोंधळ झाला पाऊस थांबताच टिनपत्रे शोधण्यासाठी नागरिकाची धांदल उडाली होती. 

नर्सी नामदेव : नर्सी नामदेव येथून जवळच असलेल्या पुसेगाव येथे शुक्रवारी (ता.२६) दुपारी दीड वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वादळी वाऱ्याने शेतात झाडाखाली बसलेल्या एका शेतमजुराच्या अंगावर झाड कोसळून तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.  

या बाबत माहिती अशी की, शुक्रवारी (ता.२६) दुपारी दीड वाजता पुसेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. वादळी वाऱ्याने गावातील अनेकाच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने काही काळ गोंधळ झाला पाऊस थांबताच टिनपत्रे शोधण्यासाठी नागरिकाची धांदल उडाली होती. 

दरम्‍यान, वादळी वारे व पावसात शेतात काम करणारे जुलेखा पठाण (वय ५५), अबेदाबी सत्तारखान, जैसुबी खान हे झाडाखाली थांबले होते. या वेळी हे झाड माडून पडल्याने तीघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्याने गावातील विज पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा तुटल्या आहेत. गावातील विज पुरवठा बंद आहे.

टॅग्स