हिंगोलीत स्वस्त धान्य दुकानदारांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

शासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

हिंगोली: शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने दुकानदारांनी आज (सोमवार) तहसील कार्यालया समोर ढोल वाजवून निदर्शने केली. त्यानंतर तहसीलदार विजय अवधाने यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.

राज्यात तामीळनाडू सरकारच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करावे, धान्य व केरोसीनचे कमीशन वाढवून द्यावे यासह इतर चौदा मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी ता. 1 ऑगस्ट पासून संप पुकारला आहे. या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस असूनही शासनाकडून मागण्यांबाबत विचार झाला नाही.

यामुळे शासनाला जागे करण्यासाठी हिंगोली तहसील कार्यालया समोर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे ढोल वाजवून निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी भिकुलाल बाहेती, अशोक काळे, नवनाथ कानबाळे, फारूख पठाण, अमित बांगर, अमान गौरी, शावा पहेलवान, माणिक पाटील, एल. जी. घुगे, नागेश बांगर, मुकेश उबाळे यांच्यासह दुकानदारांची उपस्थिती होती.

त्यानंतर तहसीलदार विजय अवधाने यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या मान्य होई पर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत शासनाकडे कळविण्याचे आश्‍वासन तहसीलदार श्री. अवधाने यांनी दिले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा?

पाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'!

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल

क्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी

औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस

खडसेंबाबतचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या हाती

देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे

महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण

Web Title: hingoli news Shoppers demonstrations of cheaper grains