औरंगाबादमधील हॉकीच्या मैदानासाठी करावी लागणार आणखी प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

भारतीय खेळ प्राधिकरणामार्फत येथे तयार करण्यात येत असलेले हॉकीचे ऍस्ट्रोटर्फ मैदान पूर्ण होण्यासाठी सप्टेंबर 2017 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

औरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरणामार्फत येथे तयार करण्यात येत असलेले हॉकीचे ऍस्ट्रोटर्फ मैदान पूर्ण होण्यासाठी सप्टेंबर 2017 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

विभागीय केंद्राचा दर्जा विदर्भाला दिल्यानंतर औरंगाबादेमध्ये असलेल्या भारतीय खेळ प्राधिकरणच्या प्रशिक्षण केंद्राला पाच कोटी रुपयांच्या हॉकी ऍस्ट्रोटर्फ मैदानाची भेट देण्यात आली. त्यानंतर नियोजित वेळेपेक्षा अनेक महिन्यांनी उशिरा हे मैदान तयार करण्याचे काम सुरू झाले. रिओ ऑलिम्पिकच्या धर्तीवर तयार करण्यात येत असलेल्या या मैदानाला मात्र "विलंबाची' लागण झाली आहे. मैदानाचे काम हिवाळ्यात पूर्ण करण्याची मुदत सरकारच्या वतीने काम करणाऱ्या एजन्सीला वाढवून देण्यात आली.

अवघ्या वीस दिवसात एक लाख लिटर जलसाठ्याची क्षमता असलेल्या हौदाची निर्मिती अवघ्या 20 दिवसात करण्यात आली असली तरी या मैदानालगत असलेल्या वॉटर ड्रेन सिस्टमचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु आहे. हे मैदान पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 मे होती. मात्र आता ती ही पाळली जाणार नसून मैदानाचे काम पूर्ण होण्यासाठी सप्टेंबर 2017 ची वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Hockey stadium will complete in September 2017