उच्च तंत्रज्ञानानाद्वारे नोकरीला लावण्याचा 'उद्योग'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

दिल्लीहून दहा मायक्रो मोबाईल खरेदी केल्याचे उघड
औरंगाबाद - पोलिस भरतीत तोतयागिरी करून नोकरी मिळवून देणारे व "एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी दिल्लीहून दहा मायक्रो मोबाईल खरेदी केले होते. याद्वारे ते आगामी काळात विविध स्पर्धा परीक्षा देऊन मुलांना नोकरीस लावणार होते, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.

राजू भीमराव नागरे (रा. कांद्राबाद) व दत्ता कडूबा नलावडे (रा. भालगाव, ता. औरंगाबाद) अशी या दोघांची नावे आहेत. ठाणे येथे एप्रिलमध्ये झालेल्या पोलिस शिपाई भरतीत या दोघांनी भारत राजेंद्र रूपेकर (नानेगाव, ता. पैठण) व तेजराव बाजीराव साबळे (रा. कांद्राबाद) यांच्या जागी लेखी परीक्षा दिली होती. तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी परीक्षेत गुणवत्ता मिळवली. "आयफोन' व "वन वे कॉलिंग मायक्रो मोबाईल'द्वारे त्यांनी प्रश्‍नपत्रिका बाहेर पाठवून उत्तरांची देवाणघेवाण केली होती. त्यांची हा बनाव उघड झाल्यानंतर या प्रकरणात परीक्षेत गुणवत्ता मिळवून देणारी टोळी असल्याची बाब समोर येत आहे.

नागरे व नलावडे "एमपीएससी' परीक्षेची तयारी करतात. त्यांनी दिल्लीहून तब्बल दहा "वन वे कॉलिंग मायक्रो' मोबाईल खरेदी केल्याची बाब समोर आली. पोलिसांनी ही तांत्रिक साधने जप्त केली आहेत. या प्रकरणात ठाणे येथील काही कर्मचाऱ्यांवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासणीत पोलिसांना "आयफोन' कसा आढळला नाही, तसेच परीक्षेवेळी पर्यवक्षेकांची भूमिका काय होती, याचाही तपास होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस ठाण्याला रवाना
पोलिस भरतीतीतल तोतयेगिरीचे घटनास्थळ ठाणे पोलिस मुख्यालय आहे. यामुळे या घटनेच्या तपाससाठी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जाधव व त्यांचे पथक शुक्रवारी ठाणे येथे रवाना झाले. चौकशीत तेथील पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे यांनी दिली.

Web Title: Industry to employ high technology