प्लस-मायनसच्या अफवेने उमेदवारांची घालमेल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

लातूर - हे केंद्र प्लस तर ते गाव मायनस...! या समाजाचे मतदार आपल्या बाजूने तर त्या जातीचे लोक विरोधी पक्षाच्या बाजूने गेले...! असा एक ना अनेक प्रकारचा अंदाज बांधत राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना हैराण करून सोडले आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांची जिरविण्यासाठीही अफवा पेरल्या असून त्यानेही उमेदवारांची घालमेल होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल तोंडावर आला असतानाही कार्यकर्त्यांकडून आकडमोड व पैजा सुरूच असल्याने मतदानापासूनच मतमोजणीचे दिवस काढताना उमेदवारांच्या नाकीनऊ आले आहे. 

जोरदार प्रचारात सर्व प्रकारचे डावपेच खेळून विविध पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. अनेक नवे मुद्दे पुढे आणून मते मिळविण्याचे प्रयत्न झाले. या सर्व संघर्षानंतर लागलीच मतमोजणी होऊन काय तो निकाल लागण्याची गरज होती. जो काय निकाल लागला असता, आणि तो स्वीकारलाही गेला असता. विजयाचा उधळलेला गुलाल अन्‌ पराजयाची धूळ विसावलीही असती. मात्र, मतदानानंतर मतमोजणी सात दिवसांनंतर आली आहे. या आठवड्यातील प्रत्येक दिवस उमेदवार व कार्यकर्त्यांना वर्षासारखा जात आहे. मतदानानंतर एक दिवस विश्रांती घेऊन पुन्हा फार्मात आलेल्या कार्यकर्त्यांनी मनाचे अंदाज बांधून राजकीय धुळवड खेळण्यास सुरवात केली आहे. पाचशेहून अधिक मतदार असलेल्या भागातील एका कार्यकर्त्याने दिलेला मतदानाचा अंदाज खरा मानून कार्यकर्ते व उमेदवार अस्वस्थ होत आहेत. काही कार्यकर्ते उमेदवार व त्याच्या समर्थक कार्यकर्त्यांना चुकीची माहिती देऊन मजा घेताना दिसत आहेत. एखाद्या उमेदवाराला गाव व भाग "प्लस" किंवा "मायनस" झाल्याचे सांगताना उमेदवाराची चुकीची निवड व उमेदवाराने मागील पाच वर्षांत मतदारांना तोंड न दाखविल्यास अनेक उणीदुणी काढली जात आहेत. यातूनच उमेदवाराला अस्वस्थ करून त्याच्या बाजूने झालेल्या चांगल्या मतदानाचाही आनंद विरोधी कार्यकर्ते मिळू देत नसल्याचे चित्र आहे. विजय व पराजयासाठी मतदानाच्या आकडेवारीवरून तुलनात्मक अंदाज मांडले जात आहेत. कोणत्या जातीचे लोक कोणत्या कारणांमुळे दूर गेले व जवळ आले, हेही सांगण्यात येत आहे. 

Web Title: Integrating candidates