लातुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

लातूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पारिजात मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. 30) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांच्या प्रतिसादामुळे पारिजात परिसरात मोठी गर्दी झाली होती. 

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जय्यत तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुलाखती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे पारिजात मंगल कार्यालयाचा परिसर गजबजला होता. राष्ट्रवादीचे निरीक्षक जीवनराव गोरे, माजी आमदार बाबासाहेब पाटील व शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस मुर्तुजा खान, प्रदेश सचिव पप्पूभाई कुलकर्णी, संजय बनसोडे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष रशीद शेख, नगरसेवक विनोद रणसुभे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेखा कदम, सामाजिक न्याय विभागाचे संजय सोनकांबळे, जाकीर सय्यद, दिलीप सोनकांबळे, इब्राहीम सय्यद, किशन समुद्रे, नगरसेवक राजेंद्र इंद्राळे, ऍड. किरण बडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.