जाफराबाद न्यायालयात एकनाथ खडसे हजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

जाफराबाद (जि. जालना) - अकोला येथे शेतीच्या वीजबिलासंदर्भात बोलताना राज्याचे तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांचे वक्‍तव्य वादात सापडले होते. त्याअनुषंगाने सुरेश दामोधर गवळी यांनी दाखल केलेल्या खटल्यात आज खडसे यांना जाफराबादेत दिवाणी न्यायाधीश एन. ए. सरोशिया यांच्या न्यायालयासमोर हजर राहावे लागले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

राज्याचे महसूल आणि कृषिमंत्री असताना खडसे यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये अकोला येथील आढावा बैठकीत शेतकऱ्यांबाबत वक्तव्य केले होते. "शेतकरी मोबाईल बिल भरू शकतात, मग कृषिपंपाचे वीजबिल का नाही?' असे ते म्हणाले होते. त्याअनुषंगाने कॉंग्रेसचे सुरेश गवळी यांनी जाफराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर दिवाणी न्यायालयात 2014 मध्ये खडसे यांच्याविरुद्ध खटला दाखल केला गेला. त्या अनुषंगाने खडसे यांना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर राहावे लागले. न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी सात ऑक्‍टोबरला होणार आहे.