टॅंकरच्या धडकेत कारमधील तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

जालना - रेवगाव फाट्याजवळ भरधाव डिझेलच्या टॅंकरने कारला दिलेल्या धडकेत तीन जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (ता. 1) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. औरंगाबाद येथून नांदेडकडे निघालेल्या डिझेल टॅंकरने गुरुवारी पहाटे हिंगोलीहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये कारमधील गुलाबखॉं कासमखॉं पठाण ( रा. खुडस, जि. हिंगोली) हे जागीच ठार झाले, तर शन्नोपरवीन सलमान पठाण (वय 23), समीन सलमान पठाण (वय चार महिने, दोघे रा. वाई, जि. वाशीम) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा डिझेल टॅंकर कारला धडक देऊन विजेच्या खांबाला जाऊन धडकला. त्यानंतर टॅंकरचालकासह त्याच्या साथीदाराने तेथून पळ काढला. ही संधी साधून परिसरातील अनेकांनी मिळेल त्या सहायाने टॅंकरमधील डिझेल पळविल्याचे स्पष्ट झाले.