नारायण राणेंना भाजपने प्रवेश देऊ नयेः दीपक केसरकर

उमेश वाघमारे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

जालनाः नारायण राणे यांच्या सारख्या अपप्रवृत्तीच्या लोकांना भाजपने प्रवेश देऊ नये. भाजप हा चांगला पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी चांगल्या लोकांना प्रवेश द्यावा, असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला दिला.

जालना येथे नितीन कटारिया खून प्रकरणी आज (शनिवार) भेट देण्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर जालना येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, 'नारायण राणे यांना जनतेने दोन-तीन वेळा झटका दिला आहे. त्यातून ही ते सुधारले नाहीत. आपण महाराष्ट्राला काय दिलं, त्यापेक्षा मला काय मिळणार होतं, ते नाही मिळालं तर मी काय करू शकतो, अशी राणे यांना पैशांची गुर्मी होती. ती गुर्मी जनताच उतरवू शकते. ते सतत पैशांच्या जोरावर बोलत होते. देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शून्य करप्शन घोषणा केली आहे. त्याच वेळी भाजप नारायण राणे यांना पक्ष प्रवेश देत असेल तर भाजप आमचा मित्र पक्ष, या नात्याने आम्ही त्यांना सांगू की, राणे यांना प्रवेश देऊ नका. कारण केवळ गाडी ओहर टेक केली म्हणून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण केली जाते. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आरेतूरेची भाषा वापरली जाते. ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. त्यामुळे अशा अपप्रवृत्तीला आम्ही कोकणातून हद्दपार केले आहे. त्यामुळे आता भाजपने अशा अपप्रवृत्तीला प्रवेश देऊन थारा देऊ नये.'

'आज महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत, त्यामुळे आशा लोकांना भाजपने पक्ष प्रवेश देण्याची गरज नाही. जर प्रवेश दिला तर भाजपने अशा अपप्रवृत्तींना राजमान्यता दिली, असे होईल. त्यामुळे भाजप एक चांगला पक्ष आहे. त्यांनी चांगल्या लोकांना पक्षात प्रवेश द्यावा, अशा लोकांना प्रवेश देऊ नये,' असा सल्ला केसरकर यांनी दिला.