कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री गंभीर नाहीत: पृथ्वीराज चव्हाण

भगवान वानखडे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

जालना : इच्छा नसताना देऊ केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना दिवाळीच्या आधी मिळेल की नाही याबाबत शंकाच आहे. दिवाळीपुर्वी गोडभेट देण्याचे आश्‍वासन करणारे मुख्यमंत्री मात्र याबाबत गंभीर नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

जालना : इच्छा नसताना देऊ केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना दिवाळीच्या आधी मिळेल की नाही याबाबत शंकाच आहे. दिवाळीपुर्वी गोडभेट देण्याचे आश्‍वासन करणारे मुख्यमंत्री मात्र याबाबत गंभीर नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

जालना व्यापारी महासंघाच्या वतीने आज (शुक्रवार) आयोजित संवाद कार्यक्रमात श्री. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, 2018 ला सत्ताधारी निवडणुका घेण्याच्या विचारात आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. इव्हीएमचा घोळ जरी असला तरी निवडणूक आयोग याबाबत योग्य निर्णय घेईल अशी आशा आहे. भाजप सरकारने नोटबंदी करुन देशाच्या अर्थव्यवस्थेवर घाला घातला आहे. या तुघलकी निर्णयाबाबत आता कुठेतरी समाज माध्यमातून आवाज उठवल्या जात आहे. या भितीपोटीच 2018 मध्येच निवडणुका घेण्याचे या सरकारचे षडयंत्र आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्य भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प केला होता. त्यामध्ये यशही आले होते. परंतु, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून अंधारात ढकलणार्‍या या सरकारला आता काय म्हणावे असाही प्रश्‍न उपस्थित केला. काँग्रेस विरोधासाठी विरोध करत नाही. मात्र, सत्तेत वाटा घेऊन मंत्री मंडळात जनतेचे प्रश्‍न न सोडवता रस्त्यावर उतरणार्‍या शिवसेनेला रस्त्यावर येण्याची गरज तरी काय म्हणत  चिमटे काढले. शिवसेना केवळ नुसते फोटोसेशन करत असल्याचा आरोपही केला.'
 
पवारांचे मध्यवधीचे वक्तव्य खरे वाटू लागले
निवडणुकांचा निकाल लागताच राज्यात मध्यावधी निवडणुका होतील हे शरद पवारांचे वक्तव्य यापुर्वी खरे वाटत नव्हते. परंतु, आता मात्र त्यांचे विधान खरे वाटू लागले आहे. राज्यातील राजकिय उलाढाली पाहता  मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे सुचक वक्तव्य श्री. चव्हाण यांनी केले.

'असे कित्येक येतात-जातात'
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंबाबत विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले की, पक्षात असे कित्येक जण येतात आणि जातात, त्यांचा येण्याने आणि जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही. काँग्रेस हा विशाल पक्ष आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :