दोन मुलींच्या मृत्यूने व्यथित झालेल्या पित्याची आत्महत्या

योगेश बरीदे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

परतुर, (जि. जालना) : तालुक्यातील काळ वाई येथे रविवारी (ता. २४) दोन मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे व्यथित झालेल्या त्यांच्या वडिलांनी त्याच विहिरीत आत्महत्या केल्याचे आज (सोमवार) सकाळी उघडकीस आले.

केशव रामभाऊ गायकवाड (वय ३५) हे रविवारी (ता. २४) आपल्या दोन मुली साक्षी (वय ९) व मिनाक्षी (वय ६) यांच्यासह शेतात गेले होते. त्यावेळी लिंबाच्या झाडावर माकडे दिसली. श्री. गायकवाड यांनी त्या माकडांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यात ती माकडे मुलींच्या दिशेने धावली. भेदरलेल्या दोघी बहिणी पळू लागल्या. मात्र, जवळच असलेल्या विहिरीत तोल जाऊन त्या पडल्या. वडिलांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र, यश आले नाही. पाण्यात बुडाल्याने दोघींचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे व्यथित झालेले त्यांचे वडील केशव गायकवाड काल रात्रीपासून घरातून निघून गेले होते. त्यांचा शोध घेत असताना सकाळी त्याच विहिरीजवळ त्यांची चप्पल दिसली. त्यामुळे विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. हे दुख: सहन न झाल्याने  गायकवाड यांनी त्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी व चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.