''जळगाव-सोलापूर लोहमार्ग व्हावा''

''जळगाव-सोलापूर लोहमार्ग व्हावा''

बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी आणि दक्षिण आणि उत्तर भारत यातील अंतर अडीचशे किलोमीटरने कमी होण्यासाठी जळगाव - सोलापूर हा लोहमार्ग होणे गरजेचे अशी माहिती स्वातंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीने मंगळवारी (ता. २५) दिली. 

या लोहमार्गाबाबत तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शासनाला निर्देशही दिलेले होते. याबाबत पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती नामदेवराव क्षीरसागर यांनी दिली. अनेक अर्थांनी हा मार्ग किफायतशीर आहे. यामुळे उद्योगक्षेत्राचा विकास होऊ शकतो. तसेच हा मार्ग ग्रँड सेंट्रल मार्ग होऊ शकतो. ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी बन्सीधर जाधव, हिरालाल सारडा, जवाहर सारडा, सत्यनारायण लाहोटी, विलास बडगे, मन्मथअप्पा हेरकर, सय्यद नविदुज्जमा, शांतीलाल पटेल, शाहीनाथ परभणे, अरुण डाके, वाय. जनार्दन राव, सुरेश मेखे, मंगेश लोळगे उपस्थित होते. याच्या सर्वेचे कामही पुर्ण करण्यात आले असून दहा वर्षांत या कामाची गुंतणवूक फिटून हा मार्ग देशाच्या पश्चिम भागात ग्रँड सेंट्रल मार्ग होऊ शकतो. 

दक्षिण - उत्तर भारताचे अंतर कमी होणार

या लोहमार्गामुळे महाराष्ट्रातील बुलडाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, राजस्थानमधील सवाईमाधोपुर, कोटा, मध्यप्रदेशातील उज्जैन, इंदौर, उत्तर प्रदेशातील लखनौ तसेच कर्नाटकातील विजापूर, बागलकोट, गदग, दाणगिरे, चित्रदुर्ग या जिल्ह्यांतील वाहतूक आणि उद्योगांना चालना मिळेल. तसेच, उत्तर व दक्षिण भारताचे अंतर २५० किलोमीटरने कमी होणार आहे.

तुळजापूर - शिर्डीचे अंतर घटणार; जालना, औरंगाबादचा औद्योगिक विकास

या लोहमार्गामुळे कर्नाटकातील तुळजाभवानीचे भक्त आणि शिर्डीच्या साईबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे त्यांचा सोलापूर - पुणे - नगर हा प्रवास वाचेल तर तेलंगणातील मंडळींचा नांदेड - औरंगाबाद - मनमाड - शिर्डी हा प्रवास वाचेल. ही मंडळी भविष्यात नगर - बीड लोहमार्गावरुन जाऊ शकेल. तसेच या लोहमार्गामुळे अनेक जिल्हे वाहतूकीसाठी जोडले जाणार असल्याने जालना व औरंगाबाद या औद्योगीक क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com