जळकोटवासीय घेताहेत दोन ऋतूंचा अनुभव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

जळकोट - तालुक्‍यात फेब्रुवारीच्या अखेरीसच उन्हाळ्याची चाहूल लागत असून दुपारी तीव्र उन्हाचा तर पहाटे थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. दुपारच्यावेळी मात्र ऊन वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उन्हाळ्याची जाणीव होत आहे.

डोंगरी भाग असलेल्या तालुक्‍यात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवते. यावर्षी अतिवृष्टी होऊनही विहिरींची पाणीपातळी घसरत असून पाझर तलाव आटू लागल्याचे चित्र आहे. जनावरांचा हिरवा चाराही केव्हाच संपला आहे. त्यात थंडीच्या कडाक्‍यानंतर अचानक फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सकाळची थंडी एकीकडे तर दुसरीकडे दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता वाढत असल्याने वातावरण विचित्र बनले आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन ऋतुंचे अनुभव नागरिक घेत आहेत. उन्हामुळे दुपारी शेतीतील कामेही दोन ते तीन तास थांबवावी लागत असून त्यामुळे सकाळी लवकरच शेतीकामे उरकली जात आहेत. दुपारच्यावेळी उन्ह वाढत असून सावलीत अनेकजण विसावा घेत आहेत. दुपारी जनावरांना झाडाखाली बांधून ठेवावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे आताच दुपारी ऊन तीव्र जाणवत असल्याने मे महिन्यात तीव्रता किती असेल, याची कल्पना करवत नाही.

Web Title: jalkot temperature